• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ढिगाऱ्यात बेपत्ता “त्या”वृद्ध महिलेचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2023
in खान्देश, जळगाव
0

जळगावात जीर्ण इमारती उठल्या जीवावर

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत एक महिला इमारतीखाली दाबली गेली होती. तब्बल पाच तासांच्या बचाव कार्य तसेच शोध मोहिमेनंतर महिलेचा मृतदेहच मिळाला असून हळहळ व्यक्त होत आहे.

राजश्री सुरेश पाठक (वय ७०) असे या मयत वृध्द महिलेचे नाव आहे. शिवाजी नगरात ७४ वर्ष जुनी इमारत पाठक यांची आहे. या इमारतीमध्ये ते राहत नव्हते. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार आज मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं.

राजश्री पाठक या वृध्द महिला इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर राजश्री पाठक यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची भेट
अनेक वर्षापासूनची ही जीर्ण इमारत खाली करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ती इमारत रिकामी करण्यात न आल्याने आज ही दुर्घटना घडली. दरम्यान, सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह विविध अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ मदत सुरु असल्यामुळे तिघांना बाहेर काढता आले, असे ते म्हणाले. तसेच, जळगाव शहरात ज्यांना जुन्या इमारती खाली करण्याबाबत मनपाच्या नोटिसा आल्या आहेत, त्यांनी त्या रिकाम्या कराव्या. जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


 

 

Previous Post

शिरसोली येथे नरहरी महाराजांची जयंती उत्साहात

Next Post

स्वयंभू महादेव मंदिरात कळसासह नंदी देवताची प्राणप्रतिष्ठा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वयंभू महादेव मंदिरात कळसासह नंदी देवताची प्राणप्रतिष्ठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात
1xbet russia

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon