जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील २० वर्षीय युवकाचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी येथे घडली असून युवकाचा घातपात झाला असून त्याला ढकलून दिल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कृष्णा सुधीर अहिरे ( वय २० रा, हरीविठ्ठल नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. सुरत गेटजवळील राजमालती नगरात असणार्या समृद्धी अपार्टमेंटवरून सातव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाचे सहाय्य्क फौजदार उल्हास चर्हाटे, प्रफुल धांडे, राजकुमार चव्हाण, जयश्री मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयत कृष्णा अहिरे याला कुणीतरी ढकलून दिल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी मयताच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.