जळगाव (प्रतिनिधी ) ;– इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे बदलापूर आणि कोलकाताच्या आर जी कार मेडिकल कॉलेज घटनेच्या निषेध रॅली आज दिनांक 22 रोजी इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फे पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे निषेध रॅलीचे आयोजन काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने रॅली काढण्यात आली.
या रॅली मध्ये इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. समिना खान, डॉ. नाजेमा खान, डॉ. सुमेया सालार, डॉ. गझाला अन्सारी, डॉ. एजाज शाह, डॉ. मुजिब पिंजारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्याने सहभाग घेतला.
या रॅलीचे प्रारंभ डॉ. अब्दुल करीम सालर यांनी केले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि आपल्या देशात महिला सुरक्षा हा गंभिर विषय आहे. आणि आज देशात आई, बहिण सुरक्षीत नाही. चार चार वर्षाच्या मुली सुरक्षित नाही ,डॉक्टर महिला हया 24 तास डुयटी करता त्या सुध्दा सुरक्षित नाही. देशात कडक कायदा पाहिजे त्यामुळे महिला हया सुरक्षित राहातील. मरॅली काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने येऊन भाऊच्या उद्यान जवळ येऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यकत केले व या घटनेचा तीव्र निषेध करत रॅलीचा समारोप करण्यात आला .