जळगाव ( प्रतिनिधी ) – इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा वैद्यकीय महाविद्यालय, डी एड व बी एड कॉलेज , इकरा पब्लिक स्कूलतर्फे स्व . जनरल बिपिन रावत यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
या शोकसभेत इकरा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अब्दुल कुद्दुस यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेले जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि भारतीय लष्कराच्या ११ अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी डॉ. अझिमुद्दिन काजी, डॉ नसीम आजमी, डॉ. समीना खान , डॉ. नाजिमा खान , डॉ. अनीस शेख , डॉ. गझला अन्सारी , डॉ. सुमय्या शेख , सईदा वकील , रफिक शेख , प्राचार्य इरफान शेख , प्राचार्य जमीरउद्दीन , डॉ. शेख शोएब व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.