जळगाव;- जिल्हयात कोरोना संक्रमित रूग्णांची वाढती संख्या पाहता आज ईकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित ईकरा यूनानी काॅलेज व ईकरा निवासी शाळेत तीनशे पन्नास रुग्णासाठी अधिग्रहत केले आहे. शंभर बेड काॅलेज हास्पीटल मधे व दोनशे पन्नास बेड निवासी शाळे मधे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. हाॅस्पीटल ला सेनीटाइजेशनची फवारणी करून इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्या चे काम युध्द पातळी वर सुरु आहे. या वेळी
अपरजिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे,जळगाव मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी ,उपायुक्त कपिल पवार,प्रांत अधिकारी दीपमाला चौरे ,संस्थेचे अध्यक्ष करीम सालार,डाॅ इकबाल शाह,प्राचार्य डाॅ कूद्दूस,उप प्राचार्य डाॅ शोएब,अफजल शेख व इतर अधिकारी उपस्थित होते . आपल्या देशा वरील संकट व आपले जिल्हयातील रूग्णांची सोय व्हावी व प्रशासनाला सहकाय॔ व मानवतेच्या दृष्टिकोन समोर ठेऊन संस्थेने हास्पीटल व शाळेची जागा उपलब्ध करून दिलेली आहे असे विचार ईकरा चे अध्यक्ष करीम सालार यांनी व्यक्त केले . आमचे हास्पीटलचे डाॅक्टर व स्टाफ यांचे सुध्दा सहकाय॔ रूग्णांना राहणार आहे असे ही त्यांनी सांगितले.