जळगाव (प्रतिनिधी ) – मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र व महत्त्वपूर्ण मोठा सण जशने ईद -ए -मिलाद उन नबी निमित्त दर सालाबाद प्रमाणे यंदाही अहेले सुन्नत वल जमात, जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी कमिटी, मरकज सुन्नी जामा मस्जिद, व सर्व आशिके रसूल यांच्या तर्फे आज दि. 09 रविवार रोजी जुलुसे ईद -ए -मिलाद उन नबी ( शोभायात्रा) चे मोठ्या आयोजन करण्यात आले होते.
जुलूस चे नेतृत्व पिरे तरीकत हझरत सय्यद अबू बकर मियाँ (बुऱ्हाणपूर )व मौलाना सय्यद अरशदुल कादरी यांनी तर झेरे निगरानी सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. याप्रसंगी सरकार की आमद मरहबा, रसूल की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा, नार -ए -तकबीर अल्लाहु अकबर, नार -ए -रिसालत या रसूल अल्लाह, अशा घोषणा देण्यात आल्या. जुलूस च्या अग्रभागी हजरते अब्बास अलमदार यांचा रोजा( दर्गा) ची आरस ठेवण्यात आलेली होती. त्याच्यामागे विविध प्रकारच्या सजावट केलेल्या बग्गी तसेच वाहनांवर धर्मगुरू विराजमान होते. सर्वांच्या हातात आकर्षक इस्लामी ध्वज होते. जुलूस सुभाष चौकात आल्यावर पारंपारिक पद्धतीने अजान देण्यात आली.
याप्रसंगी भीलपुरा, नियामत पुरा, मासूमवाडी, कासमवाडी, उस्मानिया पार्क, गेंदालाल मिल, शाहूनगर, चिश्तीया पार्क, इस्लामपुरा, येथील सुमारे दहा हजार आशिका ने रसूल, गुलामाने रसूल त्या ज्यूस मध्ये सामील होते. विविध चौकात ज्युस मध्ये सामील समाज बांधवांना पाणी, बिस्किट, नानकटाई, पोहे, सरबत, अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाटप करण्यात येत होते. जुलै ची सुरुवात सकाळी दहा वाजता शहरातील विविध भागातील लोक भिलपुरा येथील इमाम अहमद रजा चौकात एकत्र आल्यावर या मरकझी जुलूस ची सुरुवात होऊन पुढे घाणेकर चौक, सुभाष चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका, अजिंठा रोड वरील मुस्लिम कबरस्थानात दुपारी एक वाजेपर्यंत येऊन तेथे नात, सलातो सलाम ( पैगंबर स्तुती गीत), फातिहा खानी, दरूद शरीफ पठाण करण्यात येऊन सै. अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक करून जळगाव ज. श. म. न. पा. व जळगाव जिल्हा पोलिस दलाचे तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांचेआभार मानले केले. याप्रसंगी अबूबकर मियाँ यांनी तकरिर करून विश्व कल्याण, प्रगती भरभराटी व आरोग्यासाठी विशेष दुवा (प्रार्थना) केली.
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना अबू बकर मियाँ,मौलाना, मौलाना जाबीर रझा, मौलाना मुबारक अली, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना नौशाद साबरी, मुफ्ती रेहान रझा अशरफी, मौलाना रझा खान, शाकीर चित्तलवाला, नूरा पहेलवान, काशिफ टेलर, निहाल शेख, सय्यद उमर, सय्यद इरफान, हाजी साबीर अली, रईस चांद, मुस्तकीम भिश्ती, जावेद तेली इ. उपस्थित होते.