कोरोनाचे नियम पाळून रमजान ईद घरोघरी उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी)
कोरोना महामारीचे भयानक संकट असल्याने लॉकडाऊन लागलेला आहे. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे ईदगाहमध्ये रमजान ईदची (ईद-उल-फितर) नमाज अदा न करता घरीच नमाज अदा करण्यात आली.यावेळी जगावर कोसळलेले कोरोना आजाराचे विघ्न दूर होण्यासाठी घरोघरी मुस्लिम समाज बांधवानी अल्लाहकडे प्रार्थना केली.
मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सर्वात मोठा सण असतो. महिनाभर कडक उपवास केल्यानंतर यादिवशी उपवास सोडले जातात. ईदच्या दिवशी शहरातील विविध मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण केले जाते. समाजबांधवांसह अन्य धर्मिय मित्र परिवारालाही यादिवशी शीरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रित केले जाते.
यंदा मात्र कोरोनाने या सणाचा आनंदही हिरावून घेतला. सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज पठण केले.
कोरोनाच्या संकटाने मुक्ती मिळावी, यासाठी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाजमध्ये अल्लाहची प्रार्थना केली. आपले नातेवाईकांनी व हिंदू मुस्लिम बांधवांनी फोनवर व्हाट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या.
आज देशभरात ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या सणासाठी लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वेळची ईद ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन साजरी होत आहे. घरीच नमाज पठण करून ईद साजरी केली जात आहे.