जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजी नगर हुडको भागात राहणारे आनंदपाल बाविस्कर यांच्या उघड्या घरातून दि. ११ जुलै रोजी पहाटे ५ वाजता २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मुद्देमालासह रविवारी दि. १४ जुलै रोजी सकाळी अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा पांडूरंग सोनवणे (वय २८ रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील शिवाजी नगर हुडको भागाता आनंदपाल बाविस्कर यांच्या घरी दि. ११ जुलै रोजी पहाटे मार्निंग वॉक करण्यासाठी गेले असताना चोरी झाली होती. त्यावेळी त्यांच्या पुतण्या घरात झोपलेला होता. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. (केसीएन)याचा फायदा घेत संशयित आरोपी कृष्णा सोनवणे याने घरातून २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी कृष्णा सोनवणे याने केले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधिर साळवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत रविवारी दि. १४ जुलै रोजी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ किशोर निंकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, सतिष पाटील, पो.ना. योगेश पाटील, अमोल ठाकूर यांनी केली आहे.