गाजर हे चांगले पाेषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात अ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर काेशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल. गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असताे.हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पाेटात तयार हाेणारी आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबराेबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत हाेते.गाजर हे चांगले पाेषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात अ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे.
त्यामुळे हिवाळ्यात गाजर काेशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल.गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असताे.
कडधान्यांमध्ये प्राेटीन जास्त प्रमाणात असतात. कडधान्यांना माेड आणल्यावर ती पचायला हलकी हाेतात. व्यायामामुळे आपली बरीच ऊर्जा खर्च झालेली असते. अशावेळी शरीराला प्राेटीन्सची आवश्यकता असते. दिवसातील पहिले खाणे म्हणजेच नाश्ता हा प्राेटीन्स युक्त असावा असे आहारतज्ज्ञही सांगतात. माेड आलेली कडधान्ये कच्ची, फक्त उकडून, उसळ करुन किंवा मिसळीसारखी खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा हाेताे.स्निग्ध गुणांच्या तसेच उष्ण आणि मधुर गुणांच्या लसणाचा या काळात आहारात समावेश करावा. लसणात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असताे. पाेट साफ हाेण्यासाठी बाेरे मदत करतात. लहान मुलांसाठी बाेरे उत्तम टाॅनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टाॅनिक असल्यासारखे घटक आहेत.हिवाळ्यात त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. बदाम, काजू, मनुका, अक्राेड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.