जळगाव ( प्रतिनिधी ) – इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शहरातील वाल्मीक नगरात घडली .
अश्विनी रोहित सपकाळे (वय 22) असे मयत विवाहितेचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते
शहरातील वाल्मिक नगरमध्ये अश्विनी सपकाळे या पती रोहित सपकाळे , सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. आज सकाळी पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या.
यावेळी त्यांना इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.