• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

हिंगोणा येथील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू 

फैजपूर (प्रतिनिधी):- येथील जवळच असलेल्या हिंगोणा (ता. यावल) गावात मजुराला उसने पैसे दिल्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात सुनील आनंदा इंधाटे (वय ४५, रा. आंबेडकर नगर, हिंगोणा) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकावर जखम झाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील इंधाटे यांनी केळीचे काम करणाऱ्या रवी तायडे नावाच्या मजुराला २,००० रुपये उसने दिले होते. या गोष्टीचा राग आरोपी चेतन वसंत तायडे (रा. हिंगोणा) याला आला. यावरून ५ मे २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हिंगोणा गावातील आंबेडकर नगर भागात, फिर्यादीच्या घराबाहेर रोडवर आरोपी चेतन तायडे याने सुनील इंगळे यांना गाठले. “तू रवी तायडेला पैसे का दिले?” असे म्हणून आरोपीने इंगळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी चेतन तायडे याने सुनील इंधाटे यांना लाथाबुक्क्यांनी आणि चापट्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, रागाच्या भरात आरोपीने एका धारदार शस्त्राने सुनील इंधाटे यांच्या नाकावर वार केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. मारहाण करताना आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर जखमी सुनील इंधाटे यांनी फैजपूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी चेतन वसंत तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोईनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ/१८४२ देवेंद्र वसंत पाटील करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे हिंगोणा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.


 

 

Tags: #faizpur crime news #jalgaon #maharashtra police #bharat
Previous Post

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 
1xbet russia

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
1xbet russia

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon