यावलमध्ये स्नेहमेळाव्यात उत्साह
यावल (प्रतिनिधी) : गेल्या २१ वर्षानंतर हिंगोणा येथील प्रभात विद्यालय शाळेत शाळेतील २००२-२००३ वर्षातील १० वीच्या विदयार्थी व विद्यार्थांनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी मेळावा तब्बल २१ वर्षानंतर झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेतील माजी मुख्याध्यापक सदानंद पाटील हे होते. शाळेत माजी शिक्षक यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी यांनी आपली जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मनोज गाजरें, धांडे, फिरके, एस.सी पाटील तसेच विद्यार्थी निलेश बोरणारे, राहुल झांबरे, निलेश निंबाळे, सचिन गाजरे, लिना जावळे, पुनम कोल्हे, सुनेशा भोळे, सचिन गाजरे, देवानंद तायडे, शब्बीर खान, विलास भालेराव, गिरीष गाजरे आदी विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते .