महाराजांचे तत्त्व आणि विचार पोहचविण्याचे ठरत आहे माध्यम
जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष होत आहेत . या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून रवींद्र पाटील यांच्या अभ्यासातून आणि रत्नाकर पाटील यांच्या शब्दांकनातून हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका २०२४ निर्माण करण्यात आली. या दिनदर्शिकेची सजावट ( डिझायनिंग) संदीप पाटील यांनी केली . हे कॅलेंडरे डिसेम्बर अखेर नवीदिल्ली मध्ये महाराष्ट्र सदन येथे प्रकाशित करून वितरित केले जात आहे.
साधारणतः दिनदर्शिका सर्वांच्याच घरात भिंतीवर असतात. पण हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका २०२४ च्या प्रत्येक महिन्याच्या पानावर महाराजांच्या गुंणाची,तत्वांची आणि कौशल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेली स्वराज्याची तत्वे आजच्या युगात कशी महत्वाची आहे याचाही ठसा त्यावर आहे. त्यातून प्रेरणा मिळून उत्साह व ऊर्जा मिळते. ज्यांनी ज्यांनी या दिनदर्शिकेची पाने वाचली त्यानां नव ऊर्जा प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही.
प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे कॅलेंडर ऊर्जेची शिदोरीच आहे. इतिहासाची आवड असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. प्रत्येक दिनांकाला महाराजांच्या कालखंडात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याची नोंद त्या सालासह आहे. अशी माहिती सर्व सामान्यांच्या घरात सुलभरित्या या माध्यमातून पोहचली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. त्यांचा इतिहास आणि त्यांनी समाजाला दिलेल्या तत्वांना घरा घरात पोहचविण्याचा संकल्प होता. शिव राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षानिमिताने हिंदवी स्वराज्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून हा संकल्प पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला- डॉ. केतकी पाटील