कमळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील कमळगाव चांदसणी शाळेस ग्रामपंचायत व बेन्टली सिस्टिम इंडीया कंपनी तर्फे संगणक संच व प्रोजेक्टर भेट मंगळवारी देण्यात आले.
कमळगाव शाळेस ग्रामपंचायत चांदसणी मार्फत चौदाव्या वित्त आयोगातून संगणक संच व प्रोजेक्टर मिळाले. तसेच कमळगाव शाळेचे माजी विदयार्थी समाधान बोरसे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या मार्जदर्शनाने बेन्टली सिस्टिम इंडीया प्रा. लिमिटेड कंपनी मार्फत संगणक संच व प्रोजेक्टर प्राप्त झाले.या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी डाँ.भावनाताई भोसले , केंद्रप्रमूख अशोक सैंदाणे,चांदसणी संरपच रविंद्र धनगर, गणेश पाटील व ग्रामविस्तार अधिकारी के.बी. कोळी उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदा मोरे ,सदस्य खेमचंद धनगर, लक्ष्मण खंबायत ,.विशाल सर, शाळेतील शिक्षक माधव ठाकरे,अर्चना शिंदे,नयना जैस्वाल उपस्थित होते. मुख्याध्यापक समाधान बोरसे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.