कामगार जागीच ठार ; दोन जखमी
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली गावाजवळ जैन कंपनीतून घराकडे निघालेल्या दोघे भावाच्या दुचाकीला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक प्रल्हाद धनराज चौधरी वय 52 जखमी झाला तर त्याचा भाऊ भगवान धनराज चौधरी वय 46 दोघे रा. म्हसावद हा जागीच मृत्युमुखी पडला तर दुचाकीवरील बसलेला हिरालाल काशिनाथ कुंभार वय 38 रा शिरसोली हा एक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमींवर उपचार सुरू असून पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती असी शिरसोली रोडवर असलेल्या जैन कंपनी येथे कामाला असलेले भगवान धनराज चौधरी (वय 46) व मोठे भाऊ प्रल्हाद धनराज चौधरी (वय 52) हे दोघे भाऊ असून ते म्हसावद येथे ओम शांती केंद्र, लमांजन रोड या भागात राहतात. त्यांच्यासह कामाला असलेला शिरसोली येथील हिरालाल काशिनाथ कुंभार (वय 38) हे तिघेही संध्याकाळी सात वाजेला काम आटोपून जैन व्हॅली येथून घरी जाण्यासाठी निघाले होते. ते शिरसोली गावाजवळ आल्यानंतर वावडदेकडून जळगावकडे येणारा आयशर ट्रक क्रमांक (एम एच 19 झेड 1715 ) याने भगवान चौधरीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात भगवान चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रल्हाद चौधरी आणि हिरालाल कुंभार हे जखमी झाले आहे.
तात्काळ शिरसोली ग्रामस्थांनी दोघांना जवळच असलेल्या देवकर कॉलेजच्या आवारातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तर एमआयडीसी पोलिसांनी मयत भगवान चौधरीचा मृतदेह हा सिव्हिल हॉस्पिटल देवकर कॉलेज येथे हलविला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती दरम्यान एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी अपघाताची माहिती घेत असून पुढील प्रक्रिया नोंद करण्याचे काम सुरू होते. जैन व्हॅली येथील अनेक सहकाऱ्यांनी देवकर कॉलेजच्या आवारामध्ये गर्दी केली होती. आयशर चालक हा घटनास्थळावरुन फरार झाला होता. व पोलिसांनी आयशर ही एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आहे.