दुपारपासून सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी
जळगाव (प्रतिनिधी ;- जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरूवात झाली. दुपारी 11 ते 30 पर्यंत 22.25 % मतदान झाले आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे . सकाळपासून मतदानाला कमी प्रमाणात मतदार बाहेर पडले असून मात्र दुपारनंतर मतदारांची गर्दी व्हायला लागली असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.








