• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत चार तर सांगलीत पाच नवे कोरोना रुग्ण ; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ११६ वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ;- महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधित झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान, कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे. एकीकडं सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जात असताना नागरिक मात्र पुरेशी खबरदारी घेतांना दिसत नाहीयेत. इस्लामपूर शहरात मात्र काही भगगत पोलिसांच्या पुढाकारने लोकांना अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून नागरिक खरेदी करत आहेत.

सांगली शहरात आजपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 7 ते 11 या वेळेत 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये भाजी खरेदीसाठी सांगलीकर नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले आहेत. तरीही शहरातील मंडईत नागरिकांची झुंबड उडाली आहे. प्रशासनाने कोणीही गर्दी न करता भाजीपाला न्यावा असे आवाहन केले आहे मात्र सकाळची गर्दी पाहिली तर सांगलीमध्ये कोरोनाचा संसर्ग व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे.

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 116
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर – 45
पिंपरी चिंचवड मनपा – 12
पुणे मनपा – 19
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
सांगली – 9
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – 1

 


 

 

Previous Post

तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी

Next Post

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon