लंडन ;- प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात आता राजघराण्यातही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. इंग्लंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढली. ज्यामुळे लोकांच्या भेटीगाठी घेताना हस्तांदोलन करु नका असं राजघराण्यातून सांगण्यात आलं होतं. आता प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.