जळगाव;- शहरातील अयोध्या नगर भागात असणार्या सदगुरू नगरातील तरूणाने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९, राहणार सद्गुरु नगर, अयोध्या नगर) असे मयत तरुणाचे नाव असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एका खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या हर्षल हा आई वडिलांसह रात्री वाजेच्या सुमारास जेवण करून झोपला. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना हर्षलने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास वडील प्रेमनाथ एकनाथ महाजन यांना आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावेळी हर्षलच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान, मृत हर्षल महाजन याचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे, पुढील तपास पोलिस करीत आहे.