जळगाव ( प्रतिनिधी ) ;- सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पहिले पाच आणि आताचे दोन असा ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या निमित्त आणि कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा भाजपतर्फे आज शहरातील जिल्हा कार्यालयात निराधार, गोर गरीब आणि दिव्यांग व्यक्तींना किराणा साहित्याचे वाटप माजी मंत्री गिरीश महाजन आणि आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
पक्षाच्यावतीने हया वर्षी कुठल्या प्रकारे जाहिरात होर्डिंग व आनंद उत्सव साजरा न करता कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकाची सेवाकार्याच्या माध्यमातून सेवा सप्ताहची सुरवात आज .२९ मे शनिवारी रोजी भाजपा जिल्हा व महानगराच्यावतीने शहरातील १०० मुकबधीर व दिव्यांग बांधवाना जीवनावश्यक वस्तू (किराणा कीट) वाटप करून सुरवात करण्यात आली. या प्रसंगी आ. गिरीष महाजन यांनी सांगितले भाजप हा सेवाकार्य करणारा पक्ष असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गेल्या सात वर्षापासून सेवा परमधर्म या भावनेतून काम करीत आले आहे. पक्षाचा व मोदी यांचा आदर्श घेऊन आज पासून संपूर्ण सप्ताह भर भाजपा महानगरतर्फे सेवाकार्य करण्यात येणार आहे.

यामध्ये रक्तदान , कोरोना चाचणी, शिबिर फंगर आजाराविषयी मार्गदर्शन व चर्चा सत्र , आरोग्य तपासणी, कोरोना योद्धाचा सन्मान असे सेवाकार्य करून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे असे सांगितले.
या प्रसंगी महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, स्थायी स सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी,डॉ.राधेश्याम चौधरी,महेश जोशी ,नितीन इंगळे विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी सुशील हासवाणी, अमित भाटीया, राजू मराठे,मनोज भांडारकर, प्रकाश पंडित,धीरज वर्मा,गणेश माळी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, अँड. सुचीताताई हाडा,दिपमाला काळे, दिपक पाटील मनोज काळे आघाडीचे अध्यक्ष डॉ.धमेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, गणेश वाणी, लता बाविस्कर, हेमंत जीशी, प्रमोद वाणी,अरुण श्रीखंडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे तसेच शोभाबाई कुळकर्णी, अनिल जोशी, अमित साळुंखे, गौरव पाटील, रोहित सोनवणे, शालूताई जाधव आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा मुकबधीर संघटनेचे विजय विसपुते, तौशिक शेख व भाजपा दिव्यागं आघाडी अध्यक्ष गणेश वाणी यांचे सहकार्य लाभले.







