• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हैदराबादमध्ये पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

 

हैदराबाद- हैदराबादमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजलाय. गेल्या 24 तासात 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने संपूर्ण शहरात पाणी साचलंय. अनेक गाड्या या पाण्यात वाहून गेल्या आहेत. हवामान खात्याने आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 14 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या चंद्रायनगुट्टा या भागात पावसामुळे काही घरांच्या भिंती कोसळल्याने तीन लहान मुलांसह 9 लोकांचा मृत्यू झाला असून 2 लोक जखमी झाले आहेत. या परिसरात बचावाचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
प्रशासनाने लोकांना त्यांच्या घरी राहण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांना राज्यात पुढच्या दोन दिवसासांठी हाय अलर्ट जाहीर करण्याचे आणि बचाव कार्य युध्दपातळीवर सरू करण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रायनगुट्टा भागात ही घटना घडली तेंव्हा AIMIM चे खासदार असाउद्दीन ओवेसी त्या ठिकाणी पोहचले. स्थानिक लोकही या मदत कार्यात भाग घेत आहेत. यानंतर नुकसानीचा अंदाज घेतला जाईल.

हैदराबादमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद एलबी नगर परिसरात झाली आहे. गेल्या 24 तासात तिथे 25 सेमी इतका पाऊस झाला आहे. काल संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले आणि ते रात्रभर कायम होते. मुख्यमंत्र्यानी या घटनेवर प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. SDRF ची टीम सर्व शहरभर बचाव कार्य करण्यात गुंतली आहे.

शहराच्या मध्यभागी असणाऱा हुसेन सागर तलाव जो याआधी अर्धा भरला होता, या पावसानंतर तो पूर्ण भरून त्याचे पाणी सर्वत्र रस्त्यावर पसरत होते. हैदराबाद महानगरपालिकेचे आयुक्त लोकेश कुमार यांनी शहरातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

पाच राज्यांत हवामान विभागाने दिला हाय अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगना राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पावसाचा हा पट्टा तेलंगनाकडून महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हैदराबाद शहरासोबतच तेलंगनाच्या इतर भागातही पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने मुसळधार पावसासोबतच वीजांपासूनही सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही आज कडक वीजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघरसह संपूर्ण कोकण प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासहित कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या काही भागातील नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा मध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे.


 

 

Previous Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर विचित्र अपघात ; दाम्पत्य ठार तर एक गंभीर जखमी

Next Post

गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon