गुटख्याची अंदाजे 50 लाखांच्या वर किंमत असल्याचा अंदाज
फिर्याद देण्यावरून पोलीस-आ.चव्हाण यांच्यात वाद
जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे हद्दीत अंदाजे 50 लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी 16 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारे येथे ट्रक.क्र.एम.एच.18 एम.0553 पकडला. हा ट्रक जळगावला गुन्हे शाखेचे पथक आणीत असताना शिरसोली – जळगाव दरम्यान जैन व्हँली जवळ हा ट्रक पहाटे 4 वाजता चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी अडविला. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला हा ट्रक आणून ट्रकमधील गुटख्याची मोजदाद आता सुरू केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की धुळे येथून चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मिळालेल्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे महेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून एका ट्रक मध्ये अवैध रित्या गुटखा जात असल्याची बातमी कळाली या संशयावरून मेव्हूणबारे येथे गुन्हे शाखेच्या पथकातील यांनी हा ट्रक अडविला या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे 50 लाखांच्या वर अवैध गुटखा साठा असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा ट्रक वरिष्ठांच्या सुचनेनुसार ट्रकला जळगाव येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेऊन सदर कारवाई करण्याचे सागण्यात आले. जळगाव ट्रक नेत असतांना पहाटे 4 वाजेच्या सुमारास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हा ट्रक शिरसोली गावाजवळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन व्हॅली येथे पाठलाग करून थांबविला. आणि या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली. हा ट्रक का सोडला मेव्हूणबारे येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल केला नाही. यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस व आ. चव्हाण मध्ये तीन तास वाद घटनास्थळी चालला यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणण्यात आला. तेथे आता सर्व गुटख्याच्या गोण्या ट्रकमधून उतरवून त्याची मोजदाद पोलिस यंत्रणा करीत आहे.
दरम्यान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मेहुणबारे पोलीस स्टेशन च्या हद्दीत हा गुटखा पकडला असताना देखील तेथे या गुन्ह्याची कुठलीही नोंद करण्यात आली नाही. त्याचबरोबर या ट्रक चालकशी किंवा व्यापारीशी संगनमत करून ट्रक सोडून देण्याचे ठरले असावे अशा संशयावरून जळगावला पोलिसांच्या सुरक्षा निगराणीत ट्रक पोहोचवला जात असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. हा ट्रक शिरसोली जैन कंपनी जवळ पाहाटे 4 वाजता आ. चव्हाण यांनी आडवला तिथे ट्रक कुठे न्यावा हा तो जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणण्यात आला. मात्र येथे माझी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आमदार चव्हाण यांनी केसरीराजशी बोलताना सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे पोलीस निरीक्षक अकबर पटेल हे घटनास्थळी उपस्थित आहेत. रावेर हत्याकांडामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे तेथे ठाण मांडून असल्याने येऊ शकले नाही.
दरम्यान राज्यांमध्ये अवैध गुटखा, अवैध धंदे यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून या धंद्यांना नेमके कोणाचे अभय आहे हे आता समोर आले पाहिजे अशी मागणी करत, आज शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख जळगावमध्ये आहे त्यांच्याकडे या प्रकरणाविषयी मांडून जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांना गजाआड करावे अशी मागणी देखील आमदार चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक अकबर पटेल आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात माझी फिर्याद घ्या या कारणावरून वाद झाला. यामध्ये पटेल यांनी सांगितले की, हा गुन्हा आमच्याकडे दाखल होऊ शकत नाही. मात्र फिर्याद कोठेही घेता येते असे सांगत मंगेश चव्हाण यांनी फिर्याद घ्याच असा आग्रह धरला. शेवट नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याशी बोलून अर्ज देण्याचे सांगितले पण सदर फिर्यादी माझी घ्या यावर आ. चव्हाण ठाम असल्याचे ते बोलून गेले. आज ते मिडिया द्वारे व गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांची भेट घेऊन झालेला प्रकारा संदर्भात बोलणार असल्याचे त्या सांगितले
दरम्यान ट्रक चालक व अन्य एक जण ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखलचे काम सुरु आहे. इतका मोठा गुटखा कोणाचा यात कोण कोण सहभागी असेल हे मात्र समोर येणार आहे.