पाणी पुरवठा व जलनि:स्सारण योंजनासाठी निधी होता प्रतीक्षेत

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान योजनांच्या अंतर्गत पाणी पुरवठा व जलनि:स्सारण योंजनासाठी फैजपूर नगरपरिषदेला उर्वरित ९ लाख ७३ हजार ६०० रूपयाचे अनुदान महाराष्ट्र शासनाने वितरित करण्याबाबत मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे.
अभियानाअंतर्गत फैजपूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या ७२ लाख, १५ हजार किमतीच्या सुधारणा कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेला ६४ लाख, ९३ हजार, ५०० रुपये इतके अनुदान राज्य शासनाकडून अनुज्ञेय होते. फैजपूर न.प.ची स्वहिश्याची रक्कम ७ लाख २१ हजार आहे. शासनाने यापूर्वी एकूण ५५ लाख १९ हजार ९०० रुपये अनुदान फैजपूर नपला वितरित केले आहे. आता मुख्याधिकाऱ्यांनी ६३ लाख ७३ हजार ७८४ एवढ्या रक्कमेचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच चोपड्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी सदर कामाचा भौतिक प्रगती अहवालानुसार योजनेचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे कळवले आहे. तसेच योजनेवर ५ लाख ५६ हजार १०० रुपये इतका जादा खर्च होणार असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार आता. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने उर्वरित ९ लाख ७३ हजार ६०० रूपयाचे अनुदान महाराष्ट्र शासनाने वितरित करण्याबाबत मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे.







