मुंबई – नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला.

मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असं पवार म्हणाले.
नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असं पवार म्हणाले.
अजितदादा नाराजीत तथ्य नाही
अजितदादा पवार नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने चालवल्या. त्यात काही तथ्य नाही. कोरोनामुळे सहकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. अजितला ताप होता. त्यामुळे ते काळजी घेत आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं सांगतानाच जितेंद्र आव्हाडही व्हेंटिलेटरवर असतानाही नाराजीच्या बातम्याही मीडियाने चालवल्या, असं पवार म्हणाले.







