हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू


पाचोरा : प्रतिनिधी — हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील भारतीय नगर परिसरात घडली. राजेंद्र लोटू डांगरे (वय ६२, रा. भारतीय नगर, पाचोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता राजेंद्र डांगरे हे लघुशंकेसाठी घरातील बाथरूममध्ये गेले होते. त्याचवेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चक्कर येऊन ते खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजेंद्र डांगरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण नोंदविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास प मनोहर पाटील करीत आहेत.








