चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तापी आणि पुर्णा नदयांच्या संगमावर व उगम क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजता ही कार्यवाही करण्यात आली आहे. यावर्षीची आठवी वेळ दरवाजे उघडण्याची आहे.
मध्यप्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील काही भागात पावसाचा तडाखा बसला होता. त्याचप्रमाणे पुर्णा नदीच्या काठावर चांगदेव, मुक्ताईनगर, मलकापुर भागातही पाऊस पडला असल्याने धरणाचे सहा दरवाजे खुले केले आहे.
पाणी पातळी – 214.000 मी.
एकुण पाणी साठा= 388.00 दलघमी.
एकुण पाणी साठा टक्केवारी = 100.00%
विसर्ग- 962 क्युमेक्स (33973 क्युसेक्स)
दरवाज्यांची सद्य स्थिती –
4 दरवाजे 1.50 मीटर उघडे
6 दरवाजे 1.00 मीटर उघडे