चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. याचबरोबर तापी नदीच्या दोन्ही तिरांवरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी हतनूर धरणाचे ४१ पैकी १२ दरवाजे १.० मी. उंचीने सकाळी उघडले. तापी नदीपात्रामध्ये २३०९६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पुढील काही तासांत ३५ हजार ते ४५ हजार क्युसेक पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असताना सायंकाळी १८ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.