रावेर (प्रतिनिधी) : संततधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याचा मुबलक साठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे रविवार दि. २५ रोजी रात्री ११ वाजेपासूनच एकूण २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सोमवार दि. २६ रोजी ६८.८ एम एम पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हतनूर धरण पाणलोट परिसरात ९ एम एम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर जळगाव, भुसावळसाठी महत्त्वाचे धरण असून भुसावळ ऑडिनन्स फॅक्टरी, वरणगाव ऑडिनन्स फॅक्टरी, मध्य रेल्वे यांना या धरणातून मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो तर भुसावळ, यावल नगरपालिका यासह इतर नगरपालिकांना देखील या धरणातूनच पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. सिंचनासाठी हतनूर धरणातून कालव्याने आवर्तने सोडली जात आहेत. रविवार दि. २५ रोजी रात्री ११ वाजेपासूनच एकूण २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत.
धरणाचा एकूण पाणी साठा ५७.११ टक्के इतका भरला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग २७४८ सुरू आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील या परिसरात बऱ्हाणपूर येथे १६.६, दीड तलाई १८.२, टेक्सा २.६, गोपालखेडा १.४, चिखलदरा २६.६, लखपुरी ३.४ मिलिमीटर याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. सोमवार दि. २६रोजी पाणलोट क्षेत्रात ६८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एरंडी, अकोला व लोहटार या ठिकाणी निरंक पाऊस झालेला आहे.