डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमात डिन डॉ. सोळंके यांचे मत
जळगाव (प्रतिनिधी ):- व्हॅल्यु अॅडेड कोर्स अर्थात मुल्यवर्धित कार्यक्रम हा नॅक मुल्यांकनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम घेणार्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. प्रशांत सोळंके यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागातर्फे हात स्वच्छतेवर मुल्यवर्धित दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डिन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांनी शस्त्रक्रिया विभागातर्फे आयोजित हात स्वच्छतेवर मुल्यवर्धित दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर डिन डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले की, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर अशा कोर्सेससाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या महाविद्याचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील हे प्रेरणादायी व्यक्तीमत्व असून सकाळी ५ वाजेपासून त्यांच्याकडून एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. शस्त्रक्रिया विभागाने व्हॅल्यु अॅडेड कोर्सबाबत घेतलेला कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
पदवीधरच नव्हे तर पदविकाधारकांसाठीही हा कोर्स महत्वाचा असून वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यु अॅडेड कोर्स हे सुवर्णसंधी असल्याचे डॉ. सोळंके यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. चैतन्य पाटील, डॉ. वैभव फरके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. परितोषसिंह ठाकुर आणि डॉ. स्मृती भोजने यांनी केले. तसेच या कार्यक्रमात डॉ. प्रज्योत आणि डॉ. सहर, डॉ. किरण जोगावडे, डॉ. शुभम कालरा, डॉ. परितोषसिंग ठाकुर यांनी सादरीकरण केले. तसेच उद्या दि. १३ रोजी डॉ. सहर, डॉ. स्मृती भोजने, डॉ. परितोषसिंग ठाकुर, डॉ. चैतन्य पाटील, डॉ. श्रीयश सोनवणे हे सादरीकरण करणार आहेत.