मुक्ताईनगर तालुक्यात हरताळा येथे घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हरताळा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ५ लाख ९१ हजार ६९३ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.

तक्रारदार रवींद्र भगवान चौधरी (वय ५१, रा. हनुमान मंदिराजवळ, हरताळा) आणि साक्षीदार रामभाऊ मधुकर पाटील यांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही घटना दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. पहाटे घरफोडी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ माजली.
याप्रकरणी रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण चोरी झालेला मुद्देमाल ५ लाख ९१हजार ६९३ रुपयांचा आहे. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) राजेंद्र चाटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
००००००००००००००००







