जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहराचे युवानेते तसेच राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस हर्षवर्धन खैरनार यांना RADIANT FACE OF MAHARASHTRA 2023 मानकरी होण्याची संधी भेटली असून यात फिनेस्ट इव्हेंटच्या फौंडर वृषाली प्रवीण यांनी शिफारस केली आहे. हा कार्यक्रम येत्या २९ जानेवारीला पुणे (वाकडं) येथे सायंकाळी होणार आहे. हर्षवर्धन हे राष्ट्रवादी पक्षांचे सक्रिय तसेच तत्पर नेतृत्व आहेत. त्यांनी लोकडाऊन मध्ये बऱ्याच रोग्नांची तसेच गरजु लोकांची मदत व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी अग्रेसर असतात. हर्षवर्धन हे समाजसेविका पुनम खैरनार यांचे चिरंजीव आहेत. व खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू म्हणून त्यांची महाराष्ट्र भर ओळख आहे.