जळगाव (प्रतिनिधी) ;- मुंबई , कोकणानंतरचा शिवसेनेचा बालेकिल्ला जळगाव जिल्हाच , ही ओळख जपायचीय असे प्रतिपादन आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांनी आवर्जून ‘केसरीराज’शी केलेल्या वार्तालापात नमूद केले.
सध्या डॉ हर्षल माने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत . उडदामाजी काळेगोरे ही जगाची रीत आहे असे म्हटले जात असले तरी राजकारण आणि समाजकारणात त्याला अपवाद असतात या ध्येयेने प्रेरित निवडक तरुणांपैकी ते एक आहेत अशी त्यांची ओळख आतापर्यंतच्या कारकिर्दीत सगळ्यांना मान्य झालेली आहे हा मुद्दा त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतात .
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी ८ वर्षे काम केले त्यांनी स्वतःच्या बळावर शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणला १८ वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. कोरोनाच्या गेल्या जवळपास दीड वर्षाच्या काळात त्यांनी पारोळा , एरंडोल आणि पाळधी येथे ३ कोरोना सेंटर अत्यंत प्रभावी पद्धतीने सुरु ठेवली आहेत. सरकारने कोरोना उपचारांच्या ठरवून दिलेल्या दरांपेक्षाही कमी शुल्कात त्या कोरोना सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात . सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना कोणताच खाजगी डॉक्टर दाखल करून घेत नव्हता. त्या काळात डॉ हर्षल माने यांनी कोरोना रुग्णांना धीर दिला होता . अमीर खान यांच्या सत्यमेव जयते या दूरचित्रवाणी कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याला पहिले बक्षीस डॉ हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली मिळाले होते . ३ वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य निवडून आणताना त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी निवडून आणल्या होत्या. अतिशयोक्ती नाही पण अडचणीतील रुग्णाला घरी जाण्यासाठी लागणाऱ्या प्रवासखर्चाचे पैसेही बऱ्याचदा डॉ हर्षल माने देतात.
या चर्चेत डॉ हर्षल मसने म्हणाले की आतापर्यंत ३ वेळा त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी समक्ष चर्चेचा योग आला मुंबईत अगदी ८ व्या मिनिटाला रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचत असेल तर ग्रामीण भागात असे का होत नाही ? हा त्यांच्या चर्चेतील एक मुद्दा होता. त्यावेळी डॉ हर्षल माने म्हणाले की उद्योजक मुंबई – पुण्यात रुग्णालये चालवत असतील तर अशी रुग्णालये ग्रामीण महाराष्ट्रात उभारण्यासाठी का पुढाकार घेतला जात नाही ? असाही मुद्दा या चर्चेत आला होता त्यावेळी ५०० खाटांचे रुग्णालय उभारून त्याचे संचालन करण्याची तयारी डॉ हर्षल माने यांनी दाखवली होती.
खरे तर मागच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीसाठीच डॉ हर्षल माने यांना उमेदवारी बद्दल शिवसेनेकडून विचारणा झाली होती पण त्यादृष्टीने तयारी नसल्याचे डॉ हर्षल माने यांनीच पक्षाला कळवले होते.
कोरोना काळात पारोळा कुटीर रुग्णालय आणि एरंडोलच्या शासकीय रुग्णालयाला मदत केली तशी मदत जिल्हा रुग्णालयालाही देण्याची तयारी डॉ हर्षल माने यांनी दर्शवली आहे १९ जून रोजी डॉ हर्षल माने यांनी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी , निदान , आणि उपचार करण्यात आले होते .