जळगाव शहरातील हरिविठल नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध घेतले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शरद भागवत धिवर (वय ४७ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हरीविठ्ठल नगरात शरद धिवर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दि. २४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी त्यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यांना नातेवाईकांनी तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहे.