जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनतापार्टीचे जेष्ठ लोकप्रिय नेते मा खा आ व मा जिल्हा अध्यक्ष स्व हरिभाऊ जावळे यांची आज दि. ३ रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरातर्फे जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण जळगाव शहराच्या महापौर सौ.भारतीताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, चिटणीस प्रा.भगतसिंग निकम, सौ.नीलाताई चौधरी, महिला अध्यक्षा सौ दिप्ती ताई चिरमाडे , जिल्हा महानगर सोशल मिडिया सहसंयोजक अक्षय चौधरी, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष जयेश भावसार, व्यापार आघाडीचे अध्यक्ष अशोक राठी शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्रवीण जाधव, जयंत चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








