जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात वीज तारांवर वायर टाकण्याच्या वादात दोन जणांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

सैय्यद जहुरअली कमरअली (वय-४४) हे . बिल्डींग नं. १८, पिंप्राळा हुडको येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ मे रोजी सकाळी शकील शेख हुसेन यांच्या गच्चीवरून त्यांनी ईलक्ट्रिक तारांवर आकोडा टाकून वायर नेली होती. यामुळे वादातून सैय्यद जहुरअरली आणि त्यांचा पुतण्या फरहान परवे शेख यांना शकील शेख हुसेन आणि आलमगीर शेख हुसेन यांनी शिवीगाळ व मारहाण केली. एका कटरने वार करून सैय्यद जहुलअली यांना दुखापत केली. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद जहूरअली यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २० मे रोजी दुपारी संशयित शकील शेख आणि आलमगीर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना अनमोल पटेल करीत आहेत .








