चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जामदा येथे एका समुदायाच्या स्तंभाजवळच्या टपऱ्या हटवण्याच्या वादात विशिष्ट समुदायाच्या घरांवर दगडफेक करीत जमावाने तुंबळ हाणामारी केली . या हाणामारीत १ जण बेशुद्ध पडला आणि अन्य ३ जण जखमी झाले . चाळीसगाव पोलीस ठाण्यात २३ आरोपींसह अन्य ४० लोकांच्या जमावावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आबा महाले ( वय २६ , रा. भिमनगर जामदा ) यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते जामदा येथे पत्नी भाग्यश्री , आई लताबाई , . वडील बापू महाले याचेसह रा असून शेती करून उदरनिर्वाह करतात . जागदा-बहाळ रस्त्यालगत जामदा ग्रामपंचायतने पूर्वी बौद्ध समुदायाला ओट्यास जागा दिलेली होती. या जागेवर स्तंभ दोन महिन्यापूर्वी बांधलेला आहे.
जामदा येथील घोडिराम चव्हाण, कृष्णा काकडे , भाऊसाहेब चव्हाण, बापू सोनवणे, रसुल पिंजारी, आरमान पिंजारी हे स्तंभाचे ओट्याला लागूनच अतिक्रमण करून टपऱ्या चालवित होते. सहा महिन्यापूर्वी जामदा बहाळ रस्त्याचे काम झाले त्यावेळी या टपऱ्या हटवण्याची ग्रामपंचायतने नोटीस दिली होती घोंडिराम चव्हाण, कृष्णा काकडे यांनी टपऱ्या हटवला होत्या . उर्वरीत टपऱ्या अजूनपर्यंत हटविल्या गेलेल्या नव्हत्या. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे लोक पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण करून टपऱ्या ठेवणार होते. आम्ही ग्रामपंचायत जामदा येथे लेखी अर्ज देवून कळविले होते की, या रस्त्यालगत स्तंभ बांधलेला असुन स्तंभासमोर अतिक्रमण करून टपऱ्या ठेवू नये त्यावर ग्रामपंचायतिने टपऱ्या हटवण्यास सांगितले होते
त्यानंतर १८ सप्टेंबररोजी मी. व ज्ञानेश्वर अहिरे, जितेंद्र महाले, नितीन महाले, सिद्धार्थ जाधव, जिभाऊ महाले, बुधा महाले, सुरेश महाले, दिपक जाधव, अशोक सोनवणे ( सर्व रा. भिमनगर, जामदा) ओट्याजवळ बसलेलो होतो. त्यावेळी रविंद्र काकडे , धनराज काकडे , दिपक काकडे, सिताराम जाधव (कोळी) , गोपाल कोळी, सागर सोनवणे , भाऊसाहेब चव्हाण , धोंडिराम चव्हाण , कृष्णा काकडे , विशाल मोरे, सोनू काकडे , भोलेनाथ काकडे, माधव काकडे , कैलास मोरे , गणेश चव्हाण , पप्पू चव्हाण , जिभाऊ काकडे , प्रविण जाधव , गणेश सोनवणे ,ज्ञानेश्वर जाधव , भैय्या काकडे, राजेंद्र काकडे, वाल्मिक वाघ, रोहिदास सोनवणे , माधव मोरे (सर्व रा. जामदा ) हे आले. की, आम्ही याच ठिकाणी आमच्या टपऱ्या ठेवणार त्यासाठी वाद झाला तरी चालेल आणि तुमचा स्तंभ तोडायची वेळ आली तरी चालेल अशी धमकी देवुन आमच्या धार्मिक भावना दुखावतील असे शब्ध उच्चारून तेथून निघून गेले. २० सप्टेंबररोजी पुन्हा हेच लोक आणि लोक सोबत जवळपास ७० लोकांच्या जमावासह आले होते . आम्ही येथेच आमच्या टपऱ्या ठेवू तुम्ही ग्रामपंचायतकडे दिलेला अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हांला सोडणार नाही अशी धमकी देवून निघुन गेले. या घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण माझी पुतणी पुर्वा महाले हिने केलेले आहे.
काल आम्ही घरी असताना भगवान काकडे , धनराज काकडे , दिपक काकडे, सिताराम जाधव (कोळी) , गोपाल कोळी , सागर सोनवणे , भाऊसाहेब चाण , कृष्णा काकडे , विशाल मोरे , सोनू काकडे , मोलेनाथ काकडे, माधव काकडे , कैलास मोरे , गणेश , महेमूद पिंजारी , जिभाऊ काकडे , प्रविण जाधव, गणेश सोनवणे , ज्ञानेश्वर जाधव , मैय्या काकडे , राजेंद्र काकडे , रोहिदास सोमवणे, माधव मोरे , पप्पू चव्हाण व अन्य ४० लोक यांनी आमच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली त्यानंतर मी व ज्ञानेश्वर अहिरे, जितेंद्र महाले, नितीन महाले, सिद्धार्थ जाधव, जिभाऊ महाले, बुधा महाले, सुरेश महाले, दिपक जाधव, अशोक सोनवणे, समाजी महाले, दिनेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, रावसाहेब महाले, प्रकाश सोनवणे, सुनिल महाले , भाईदास सोनवणे त्या जमावाला सामोरे गेल्यावर त्यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करीत धमक्या दिल्या गर्दीतील दिपक काकडे हत्यार घेवून आला व त्याने सिद्धार्थ जाधवच्या मानेवर मारले सिद्धार्थ जाधवच्या मानेला दुखापत झाली सिताराम जाधव यानेही जातीवाचक शिवीगाळ केली त्याने विट सुनिल महालेला मारून जखमी केले सुनिल महाले खाली पडल्यावर रविंद्र काकडे व धनराज काकडे यांनी पुन्हा त्याला लाथा-बुक्यांनी मारहाण केली सागर सोनवणे याने फायटरने प्रकाश सोनवणे याला मारहाण करीत जखमी केले माझे नाकावर भोलेनाथ काकडे याने दुखापत केली या वादात सुनिल महाले बेशुद्ध झाल्याने ते लोक तेथुन निघून गेले. आम्ही सुनिल महाले यास चाळीसगाव येथे उपचाराकरिता घेवुन गेलो.
त्यानंतर वैशाली महाले यांनी सांगितले की, या लोकांच्या नातेवाईक वंदना सोनवणे (कोळी) , मिना सोनवणे (कोळी), रेखा काकडे (कोळी) , खलाबाई जाधव (कोळी) , रेखा काकड (कोळी) , लताबाई चव्हाण (कोळी) , कासूबाई काकडे (कोळी), मायाबाई काकडे (कोळी) , मंगलबाई चव्हाण (कोळी) व सोबतच्या इतर ३० महिला ( सर्व रा. जामदा ) यांनीही जातीवाचक शिवीगाळ करून धमक्या दिल्या होत्या