जळगाव (प्रतिनिधी ) ;- देशात डॉक्टरांवर होणारे हल्ले अलीकडे खूप वाढले असून गंभीर स्वरूपाचा रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड आणि डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते. याचा निषेध म्हणून आज दुपारी आयएमएच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय आयएमएतर्फे राष्ट्रीय निषेध दिवस पाळण्यात आला. आंदोलनासाठी अध्यक्ष डॉ. शिरीष चौधरी, सचिव डॉ. राजेश चौधरी, डॉ. उल्हास पाटील,डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. राजेश पाटील आणि सदस्य उपस्थित होते.








