जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण शिवारातील हनुमान नगर येथील नागरिकांना हक्काचे घर मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. अखेर आयुक्तांनी निर्णय देऊन क्रीडा जागेसाठी असलेली जागेचे आरक्षण हटवून रहिवासी क्षेत्राचे करून दिले आहे. त्यामुळे अनेक मोलमजुरी करणारे कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी ३० मार्च रोजी जागेचे लोकार्पण आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यासाठी मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी नागरिकांसाठी पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केल्याने नागरिकांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.
हनुमान नगरातील मेहरूण स्मशानभूमीजवळ “प्ले ग्राउंड” आरक्षण होते. त्यामुळे विकासकामे करता येत नव्हते. पालकमंत्री व आयुक्तांना विनंती करून नागरिकांना न्याय देण्यासाठी सतत पाठपुरावा करून नगरसेवक प्रशांत नाईक यांनी नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. याठिकाणी ७२ मूळ प्लॉटधारक व पोटभाडेकरू असे मिळून १२० लोकांना लाभ मिळाला आहे. हि जागा रहिवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
गुंठेवारीअंतर्गत लेआउट मंजूर करून जागेचा आता लोकार्पण सोहळा आज गुरुवार ३० मार्च रोजी दुपारी झाला. यावेळी आ. राजूमामा भोळे, अभियंता रायसिंघानी उपस्थित होते. प्रसंगी प्रभूरामचंद्राच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. नंतर नगरसेवक प्रशांत नाईक यांनी, संबंधित जागेविषयी कराव्या लागलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती सांगितली. एकूण ७२ मूळ प्लॉटधारक १२० च्या लगभग हिस्सेदार यांचा सातबारा उताऱ्यावर नाव लागून घरावर कर्ज
मिळणे तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज करणेकरिता आता त्यांना सोपे झाले आहे. या भागामध्ये रस्ते, गटारी नसल्याने आता विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती प्रशांत नाईक यांनी दिली.
प्रसंगी आ. राजूमामा भोळे यांनी, नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळण्यासाठी मी प्रयत्नरत राहील, असे सांगितले. यावेळी नागरिकांनी प्रशांत नाईक यांचा भव्य सत्कार केला. यावेळी कुणाल बागुल, जगन्नाथ मराठे, विजय पाटिल, इंदरचंद जैन, राहुल गुंजाळ, दिनेश मराठे, लोकेश जगताप, राजू महाले, अशोक कोले, वसंत पाटिल, मोहन मराठे, विलास नाबदे, सुनील मराठे, सुनील पाटिल, प्रभाकर सोनार आदी उपस्थित होते.