मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ; विकास निधी व योजनांची कमी नाही – गुलाबराव पाटील
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजे लोकसेवेचे मंदिर – आ. मंगेश चव्हाण
चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर प्रशासकीय इमारत चाळिसगाव येथे पाहायला मिळत आहे. इमारतीचे बांधकाम दर्जेदार झालेले आहे. 26 महिन्याचा कालावधी असताना फक्तं 16 महिन्यात इमारत रेकॉर्ड ब्रेक वेळात उभी राहिली याचे संपूर्ण श्रेय आमदार मंगेश दादा चव्हाण यांना जाते. त्यांनी मोठ्या जिद्दीने MH 52 आर टी ओ कार्यालय मंजूर केले असून मला अभिमान वाटतो कि माझा एक कार्यकर्ता इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करत आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे. आमदार चव्येहाण यांनी मागणी केल्त्यायानुसार काही दिवसातच पाटणादेवीच्या पर्यटन विकासासाठी 150 कोटींचा निधी तर चाळीसगाव शहराच्या रस्ते विकासासाठी 100 कोटी निधी मंजूर करून देण्याची घोषणा ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केली, ते चाळीसगाव येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा.बां.प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता प्रशांत औटी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.अंकित, सा.बां.विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ पुं. सोनवणे, प्रांताधिकारी प्रमोद हिले, माजी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार प्रशांत पाटील, माजी तहसिलदार अमोल मोरे, माजी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, उपविभागीय अभियंता अ.ना. बैसाणे यांच्यासह जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे, मीनाक्षीताई निकम, सचिन पाटील, नवनाथ जी ढगे, आशालताताई चव्हाण, मोहिनीताई गायकवाड, वैशालीताई राजपूत, संगीताताई गवळी, प्रा. सुनील निकम सर संजू तात्या पाटील, नितीन भाऊ पाटील, विजयाताई पवार, बाळासाहेब नागरे, प्रीतम शेठ रावलानी, डॉ. रमेश निकम, संजू आबा राजपूत, चित्रसेन दादा पाटील, यु.डी. महाजन सर, बाळासाहेबजी राऊत, पोपट तात्या भोळे, योगेश भाऊ अग्रवाल, प्रशांतनाना देशमुख, रामदास भाऊ जाधव, धर्मा आबा वाघ, रवी आबा पाटील, डी आर दादा चौधरी, पवार गुरुजी, प्रेमचंद भाऊ खिवसरा, डॉ. विनोदजी कोतकर, सरदार भाऊ राजपूत, एड. प्रशांत पालवे, डॉ. देशमुख ,सुभाष दादा पाटील, विजुभाऊ जाधव, किशोरभाऊ पाटील, रमेश सोनवणे सर, बबन काका पवार, अल्लाउद्दीन दादा अविनाश नाना चौधरी, दशरथ जिभाऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील जमादार, भावडू दादा, शैलेंद्रसिंह पाटील सर, नवल पवार, निलेश पप्पूशेठ वाणी, किशोरभाऊ गवळी, प्रदीप पाटील, हेमंत, बाविस्कर, माजी सभापती कपिल दादा पाटील, साहेबराव राठोड, सरचिटणीस अमोलजी नानकर अमोलजी चव्हाण, जितेंद्र पाटील गिरीजी बराटे उपस्थित यांसह सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, चाळीसगाव तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी, अध्यात्म, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर, शासकीय कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. मंत्री महोदय व अधिकारी यांनी प्रशासकीय इमारत व त्यातील सोयी सुविधा यांची पाहणी केली.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कमी वेळात चांगली वास्तू बांधण्याचे रेकॉर्ड चाळीसगावातील या प्रशासकीय इमारतीला जाते. अडीच वर्षांमध्ये कधी नव्हे एवढा विकास निधी शासन उपलब्ध करून देत आहे. चाळीसगावचे वैभव ही प्रशासकीय इमारत आहे. हे वैभव जपण्याचं काम नागरिकांनी करावे. कुठेही अस्वच्छता करू नये, तसेच आपण बांधलेल्या या वास्तू आयुष्यभर आपल्या नावाने राहतात म्हणून मंगेश दादा चव्हाण यांच्या नावाने ही प्रशासकीय इमारत अनेक वर्ष अस्तित्वात राहील.
आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी प्रशासकीय इमारतीच्या प्रवासाबद्दल सांगितले की, 152 वर्षांपूर्वी 1862 मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर चाळीसगाव येथे मामलेदार कचेरी होती. 1772 मध्ये 21842 रुपये खर्च करून आत्ताची जुनी तहसील कचेरी उभी राहिली आणि आज 152 वर्षात नंतर 22 कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य अशी नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिलेली आहे. 06 जानेवारी 2020 रोजी पहिल्यांदा नवीन प्रशासकीय इमारतीचे पत्र देण्यात आले व 2023 रोजी त्याला अंतिम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. 26 महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणारे हे काम फक्त 16 महिन्यांमध्ये पूर्ण झाले. हे सर्व शक्य झाले मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे व माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे. लोकांना दिलासा देणारे केंद्रबिंदू ही इमारत होईल याबाबत खात्री आहे. यासोबतच नाट्यगृहाचे देखील बांधकाम सुरू आहे. तसेच नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे सुद्धा बांधकाम सुरू होणार आहे. उपप्रादेशिक कार्यालयाचे नवीन इमारतीचे बांधकामही सुरू होणार आहे. शहराच्या विकासासाठी अनेक चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यांची बांधणी सुरू आहे. नवीन प्रशासकिय इमारत म्हणजे लोकसेवेचे मंदिर असून आपल्या तालुक्याच्या वैभवात टाकलेली भर आहे.
जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बारामती पंचायत समिती पेक्षा कमी कालावधीत दर्जेदार प्रशासकीय इमारत उभी करण्याचा रेकॉर्ड या प्रशासकीय इमारतीने उभा केलेला आहे. आठ कार्यालय एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. एअर कंडिशनिंग मोठा मीटिंग हॉल या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. संपूर्ण तालुक्याची ही हक्काची जागा आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा कर्मचाऱ्यांनी गतिमान, स्वच्छ व सुंदर प्रशासन करणे गरजेचे आहे.
तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अशा इमारतीत इतक्या सुंदर जागेवर कारभार करायला मिळेल हे स्वप्न होते. मात्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाने हे स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात आलेले आपण पाहतो आहोत. लोकांची सेवा करण्याचं ही इमारत हक्काचे ठिकाण असेल अशी ग्वाही देतो.