जळगाव ( प्रतिनिधी ) — गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातून हद्दपार असूनपण जळगाव शहरात फिरणार्या तरूणाला रविवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईश्वर कॉलनी येथील ललित ऊर्फ सोनू चौधरी (वय २८) यास १० ते २० सप्टेंबरदरम्यान जळगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते . ललित रविवारी ईश्वर कॉलनीत विनामास्क फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शिकारे यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी , अनिल सिंग पाटील , सुधीर साबळे , इम्रान सय्यद , गोविंदा पाटील , सचिन पाटील यांच्या पथकास सूचना केल्या. पथकाने ईश्वर कॉलनी येथे फिरत असलेल्या ललित ऊर्फ सोनू यास अटक केली. पो कॉ सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून ललित ऊर्फ सोनू याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







