प्रतिनिधी l धानोरा येथिल देवेंद्र शांताराम चौधरी यांची मुलगी कृतिका देवेंद्र चौधरी ही ९४.४० टक्के गुण घेऊन चिंचोली ता यावल केंद्रातुन व धानोरा विद्यालयातुन प्रथम आली.द्वितीय म्हणुन दर्शना विनोद गुजर व देविशिष दिलीप चांदसरे हे दोन्हींना ९०.८० गुण मिळाले तर तृतिय यश गजानन पाटील ९० टक्के गुण मिळाले हे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील होते.
मराठी माध्यमातुन प्रथम विजय गोकूळ कोळी ८०.६० टक्के द्वितीय देवयानी नंदलाल पाटील ७८ टक्के तर तृतिय म्हणुन आरती भगवान चौधरी ७४.६० टक्के गुण मिळालेत.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन,पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक तडवी,सतपंथ ज्योत मंदिराचे अध्यक्ष बाजीराव पाटील,पोलिस पाटील दिनेश पाटील,विकासो चेअरमन अनिल महाजन,पिकासो चेअरमन पन्नालाल पाटील,डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिका चे संचालक प्रशांत सोनवणे,अमोल महाजन,राजेंद्र चौधरी,रावसाहेब पाटील,प्रशांत चौधरी,संदिप पवार यांनी अभिनंदन केले.








