• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. मंगेश चव्हाण–गुलाबराव देवकर यांच्या भेटीमुळे ‘मविआ’मध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. मंगेश चव्हाण–गुलाबराव देवकर यांच्या भेटीमुळे ‘मविआ’मध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता !

गुलाबराव देवकरांच्या सोईस्कर भुमिकेमुळे ठाकरे गट प्रचंड नाराज !

जळगाव (प्रतिनिधी) ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीमुळे ठाकरे गट दुखावला गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

उन्मेष पाटील यांचे राजकीय करिअर समाप्त करू पाहणाऱ्या आ.चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जवळीक साधत असतील, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, अशी भुमिका ठाकरे गटातर्फे मांडण्यात येत असल्याचे कळतेय. आठवडाभरापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ना.पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आ.चव्हाण यांना जशास तसे उत्तर दिले होते.

यानंतर आ.चव्हाण यांनी पालकमंत्र्यांचे राजकीय विरोधक व शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे ठाकरे गटात अस्वस्थतता पसरली आहे. कारण मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील यांच्यातील वाद अवघ्या जिल्ह्याला परिचित आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या वादाने कळस गाठला आहे. भाजपाचा जो नेता आमच्या ठाकरे गटाच्या नेत्यावर टोकाची टीका करतो, प्रमुख राजकीय विरोधक असतो त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जवळीक साधतात, हे न पटणारे आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही हे लक्षात ठेवू, असा सूर जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यातील ठाकरे गटामध्ये उमटत आहे.

जळगाव ग्रामीणमधील ठाकरे गटाच्या नाराजीचा फटका गुलाबराव देवकरांना बसू शकतो. कारण देवकरांच्या या सोईस्कर भुमिकेमुळे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते कमालीचे दुखावले गेले आहेत. उन्मेष पाटील हे उत्तर महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि त्यांच्या राजकीय विरोधकाला देवकर जवळ करत आहेत. याला आम्ही काय समजावे ? असे ठाकरे गटाच्या कार्याकर्त्यांचे म्हणणे आहे. या विषयाची तक्रार थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत होणार असल्याची महिती समोर येत आहे. दरम्यान, आमदार चव्हाण आणि देवकर यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत असून याचा फटका देवकर यांना विधानसभेत बसण्याची देखील शक्यता वर्तवली आहे.


 

 

Tags: #jalgaongulabrao devkarmangesh chvhan
Previous Post

वैशालीताई… आम्ही तुमच्या लढ्यात सोबत आहोत !

Next Post

चक्कर येऊन पडल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

चक्कर येऊन पडल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon