विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडक कारवाई

वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) –
चोपडा येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांनी आपल्या परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकांची नेमणूक केलेली आहे.
सदर या पथकाने चोपडा शहरातील काही भागांमध्ये आज झाडाझडती घेतली असता जवळपास सहा लाख रुपये किमतीचा गुटखा व दीड लाख रुपये किमतीची गाडी वर कारवाई करण्यात आलेली आहे
चोपडा गावात गुजराथी गल्लीत हेडगेवार चौक या ठिकाणी बाबू लतीफ काझी यांचे मालकीचे पत्र्याचे छत असलेल्या गोडाउन मध्ये आकाश योगेश अग्रवाल राहणार चोपडा याने सदर जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये शासकीय प्रतिबंधित अन्नपदार्थ त्यात गुटखा , सुगंधित तंबाखू व इतर पदार्थ असे विक्री करण्याचे इराद्याने बेकायदेशीररित्या साठा करून ठेवले आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी खात्री केली असता तेथे आकाश योगेश अग्रवाल वय 28 गुजराथी गल्ली चोपडा हा मिळून आला व त्यास गोडाऊन उघडून दाखवणे बाबत सांगितले असता त्याने सदर गोडाउन घडवून दाखविले व त्या ठिकाणी दोन लाख 35 हजार 840 रुपये किमंतीच्या प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू व पान मसाला मिळून आला तसेच सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांना गुप्त बातमी खबरी मार्फत मिळाली की चोपडा या गावात जय हिंद कॉलनी नागलवाडी रोड येथे अजय अरुण पाटील आपले स्वतःचे राहते घरात आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कब्जात सुगंधित तंबाखू तसेच शासकीय प्रतिबंधित अन्नपदार्थ उदाहरणार्थ गुटखा , सुगंधित तंबाखू व इतर पदार्थ असे विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या साठा करून तिचे चोरटी विक्रीकरिता साठा करून ठेवलेला आहे असे बातमी मिळाल्याने त्या ठिकाणीदेखील खात्री करण्यासाठी गेले असता अजय अरुण पाटील वय 28 वर्ष राहणार जयहिंद कॉलनी चोपडा मिळून आला त्याच्या शेजारी असलेली खोली उघडण्यास सांगितले असता त्याने सदर घराच्या दरवाजा उघडून दाखविले त्यात प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू व पानमसाला मिळून आला तसेच त्याच्या राहत्या घराच्या अंगणात उभी असलेली राखाडी रंगाची मारुती कंपनीची ओमनी व्हॅन गाडी क्रमांक एम एच 19 सी यू 6132 हे गाड़ी उघडून दाखविण्यास सांगितले असता त्याने चावी आणून सदर गाडी उघडून दाखवली असता त्या गाडीत देखील प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू व पानमसाला असा एकूण 3 लाख 46 हजार 832 रुपये किमतीच्या प्रतिबंधित अन्नपदार्थ व वाहनाची किंमत दीड लाख रुपये असे एकूण चार लाख 96 हजार 832 रुपये किमतीच्या पानमसाला व सुगंधित तंबाखू मिळून आले आहे तरी वरील केलेल्या कारवाईबाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे सविस्तर गुन्हा नोंद विण्यात आला आहे. अजून इतर ठिकाणी पण कारवाई करण्यात येत आहे .
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दीघावकर नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव , पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप पाटील , राजेंद्र सोनवणे , पोलीस नाईक नितीन चंद्रकुमार सपकाळे ,पोलीस कॉन्स्टेबल विश्वेश हजारे , पोलीस कॉन्स्टेबल दीपक ठाकूर , पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बाळू ठोंबरे ,पोलीस कॉन्स्टेबल केतन बापू पाटील इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला . सदर कारवाईमुळे चोपडा शहरातील अवैध धंदे चालकां मध्ये मोठी घबराट पसरली असून सामान्य जनतेने सदर कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे .







