जळगाव (प्रतिनिधी) :- गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त पूज्य ऋषिवर किरीट भाईजी यांचे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी जळगाव शहरात आगमन होत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन तुलसी परिवाराद्वारे करण्यात आले आहे.


हा भक्तिमय कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात पूज्य किरीट भाईजी यांचे स्वागत, गुरुपूजन, गुरुवंदना, आशीर्वचन, ठाकुरजी पूजन, शंका समाधान व प्रश्नोत्तर सत्र, गुरु दीक्षा, प्रत्यक्ष दर्शन तसेच प्रसाद वितरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
पवित्र भावनेतून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.
पूज्य किरीट भाईजी हे देश-विदेशात भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण तसेच अध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी बंधू-भगिनी, भक्त व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुलसी परिवार, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्क : नीलकंठ सरोदे व तुलसी परिवार, जळगाव, मो. ९४२३१८७३९०








