जळगाव (प्रतिनिधी ) –शहरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत असून २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडली. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.