जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील २६ वर्षीय तरूणीला शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून अपहरण करत हैद्राबाद येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात राहणारी २९ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १३ सप्टेंबररोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह ( रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरूणीला तिच्या राहत्या घरात शितपेयमध्ये गुंगीचे औषध देवून बेशुध्द केले. नंतर तिला कारमध्ये बसवून थेट हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी घेवून गेला. त्याठिकाणी तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरूध्द घरात डांबून ठेवले दरम्यान तरूणीला मारहाण सुध्दा केली. तरूणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे कळवत बदनामी केली. कशीबशी संशयित आरोपीच्या तावडीतून सुटून तरूणीने जळगाव गाठले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि अनिस शेख करीत आहे.