जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी आनंदा शामराव पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली.
यावेळी पालकमंत्र्यांचा हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी संगीता आनंदा पाटील यांना शासनाच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले. पालकमंत्र्यांचा हस्ते ३० हजार रुपयांचा धनादेश धनादेश व 70 हजार रुपयांची पोस्टाची पावती देण्यात आली.
याप्रसंगी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार विनयकुमार देवरे, पं. स. सभापती मुंकुंद नन्नवरे , माजी सभापती अनिल पाटील, टिकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.