जळगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कानळदा येथे तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेच्या शॉपिंग कॉम्प्लेस व गोडाऊनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तालुक्याच्या सहकार क्षेत्रात कानळद्याचे योगदान असून सहकार जगला तरच शेतकरी जगेल असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा संचालक रवींद्र भैय्या पाटील हे होते.

भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, तालुक्याचा सहकार क्षेत्रात कानळद्याचे योगदान असून पणनचे संचालक व कापूस उत्पादक सेवा संस्थेच्या चेअरमन व संचालकांचे कार्य कौतुकास्पद आहे. कानळदा संस्थेचा प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी संस्थेला (५१ हजार) एक्कावन हजाराची देणगी ही जाहीर केली.







