जळगाव (प्रतिनिधी):- शिवसेनेचे नेतृत्व करणारे “मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत आसोदा येथील फुले, शाहू, आंबेडकर संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्यांसह शेकडो भीमसैनिकांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या झुंजार नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहोत. महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
भिमसैनिक आणि शिवसैनिकांचे ऐक्य अभिमानाची बाब असून आपली साथ विरोधकांना धडकी भरवणार असे प्रतिपादन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. आसोदा येथील फुले, शाहू , आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच चंदन बिऱ्हाडे यांचा आज शिंदे शिवसेनेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
त्यांच्या सोबत संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील, लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दिपक मरसाळे, पवन मरसाळे, नितीन साळुंखे यांनीही शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननवरे , तुषार महाजन, अजय महाजन, नारायण कोळी, मनोज चौधरी, आबा माळी, कैलास चौधरी, श्याम कोगटा आदी उपस्थित होते.