• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळमधील अपघातग्रस्त जखमींच्या मदतीसाठी पालकमंत्र्यांचे शर्थीचे प्रयत्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात ; सशस्त्र दल व लष्कराकडून मदतकार्य सुरू !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वरणगाव येथील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात होऊन त्यात १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांसह नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

नेपाळ येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी बस अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळवेल या गावातील ४१ भाविक या बसमध्ये होते, अशी माहिती समोर आली आहे. यात वरणगाव येथील माजी नगरसेवकांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील बसमध्ये होतं. पूर्ण बस ही जळगाव जिल्ह्यातील भाविकांचीच होती, अशी माहिती मिळाली आहे. जळगावमधून ११० जण नेपाळला गेले होते. या अपघातात चालक आणि वाहकांसह १४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघात जिथे घडला ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेपाळच्या सशस्त्र दल व लष्कराकडून मदतकार्य सुरू झाल्याची माहिती ना. पाटील यांना स्थानिक प्रशासनाने दिली आहे. जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांना अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्वतः देखील नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संपर्कात असून जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ना. पाटील हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. तसेच महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.


 

 

Previous Post

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

Next Post

इयत्ता आठवीतील दोन शाळकरी विद्यार्थांचा तलावात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इयत्ता आठवीतील दोन शाळकरी विद्यार्थांचा तलावात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon